Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Thursday, February 4, 2016

व्यक्त ...


मला ,
कुणीतरी आज अवखळ नदी म्हटल ,
संतत प्रवाही वाहणारी ,
रोज नव्याने फुलणारी ,
नवी स्वप्न वीणणारी … 
म्हटल त्याच अवलीयाने ,
गं तू तर शुद्ध शक्ती 
नी अस्सल कलाभोक्ती 
आठवण करून दिली त्यानेच 
दररोज आरशात पाहून 
खळखळून हसण्याची 
स्वप्न बघता बघता 
ती खरच आपण जगत आहोत
 हे तितकाच खराखुरं भासण्याची 
गम्मत आहे सांगता सांगता
 शिकवून गेला काहीबाही 
अनुभूती येईल काही दिवसात 
देत होता खट्याळ ग्वाही 
आकाश होते गडद जांभळे 
होते हजार लखलख ठिपके 
त्यात होता ऋतू बावरा
वाऱ्याचेही हजार नखरे 
नको करू मंथनाशी सलगी  
असेच तोही सुचवत होता 
ध्यानधारणा जीव गुंतणे
सूटवण्यास तो संथपणे 
मज पटवत होता 
पांघरून नीज तो अलगद झाला वेगळा
घेऊन उशाशी शब्द त्याचे श्वास माझा आगळा 
उतरले नक्षत्र आज त्याच्या जणू मुखातुनी 
लेखणी माझी थिटी, स्फुरते उरा-स्वरातुनी 
मुक्त मी नी युक्त तो तरी ध्यास का वाटे जरा 
स्वमनस्वी मम म्हणावे, परतुनी नच आता फिरा 
फेर बंधा बांधला आता उड्डाण जाहले 
चिरनीद्रेतूनही सत्यात त्याला पाहले 

- प्राजक्ता साठे





No comments:

Post a Comment