Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Tuesday, April 3, 2012

मोहोळ


मनात मोहोळ विचारमक्षांचे
उठती हृदयी स्पंदनज्वाला
भाव तृषेचा तृप्त न होई
उरी आठवण तुझीच येता

किणकिणती हे अजुनी कंकण
रुणझुणती ते लाजरे पैंजण
नथ बुजरी जरी, चमकोनी तरी
करी इशारा तुजवर मोहून

प्रेमज्वराला कसले औषध
कसली निद्रा कसले मार्दव
लसलसते ते अंगी लाघवी
तुझेच बिंब ते चक्षुमधले

स्वार जरी हे खूळ तरी
वार होऊन हार करी
हरण्यात सौख्य मज मिळेल जरी,
ते जपून खोवीन खोप्यामधी
रात्रारंभी निद्राधीन होता
असशील तू मग माझ्या जवळी
सोडूनी जेव्हा केशसंभार हा
स्पर्शातून त्या सुकुमार बटांच्या
होशील माझा धुंद अनुभव
असेल तेची अमूल्य वैभव