शाश्वत सत्य???
चूक केली कि दंड स्वरूपी कर आकारला जातो
आणि उत्तम काम केल कि कर स्वरूपी दंड …
मोहाला आवर घालण्यात घालवलेल आयुष्य निष्फळ असाव….
गोंधळ उडाला कि मी पटकन पुढच पाउल टाकते
अस मी फार टेचात म्हणायचे पूर्वी
कालाचक्रामध्ये बरोबर किवा चूक काहीही नसत …
असते ती फक्त हालचाल…
हानी काहीतरी करून होते ….
काहीही न बोलून सुद्धा होते
मला तू आवडतोस
हे म्हणायला इतके दिवस का लावतेय मी?
जनाची भीती, मनाची कि तुझी?
खर म्हणजे EGO आड येत असेल का माझा?
कि मैत्री घालवून बसेन ही भीती?
कि त्या पेक्षा मीच का पुढाकार घ्यावा हा अहंकार?
निरपेक्ष प्रेम तू हि समजतोस आणि मी हि
तरीही धीर न व्हावा?
Heartbreak चा डर ह्या वयात नसतोच मुळी
तुझ दुसऱ्या कुणावर निस्सीम प्रेम आहे
हे हि मी स्वीकारल
तू तिसऱ्याच कुणाशीतरी लग्न करायला निघालायस
हे हि मी मान्य केल
आपल लग्न ह्या जन्मात तरी शक्य नाही
हि गोष्ट मनाला पटली आहे
तुझ्यातल्या समंजसपणाची जाणीवही आहे
तरीही तुला न सांगण्याचा अट्टाहास…
का?