Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Thursday, November 5, 2009

:D



प्रेमात पडण्यासाठी
डोकं लागत नाही
कि नोटांच्या बंडलाचं
खोकं लागत नाही
लागतो वेडेपणा
बेहत्तर फसण्याचा
तरीही
त्याच्याकरता तिने
आयुष्यभर असण्याचा

4



शब्दांचे झाले झुले
कविता त्यातून फुले
दुख ज्याला सले
त्याचे त्यालाच कळे...

Thoughts...



गंध हवा हि धुंद दरवळला सुगंध आठवांचा आठवला मज तो क्षण , तो तू नी ती मी हि ... जेव्हा पडला विसर सारा ... शहारलास तू मोहरले मी नी बहरलो दोघे आपण ... मनावर कोरलेली आठवण जाऊदे न .... जड शब्द न वापरता एवढेच सांगते कि ... वेड लागले होते ...

भूमिका



आयुष्यातली स्थित्यंतरं खरतर खूप असतात , पण काही फार वाट पाहायला लावतात , परीक्षा घेतात नी मोठं करून जातात ... आपल्या माणसाला क्षमा करायला फक्त एक विचार करावा लागतो . आपण तर बऱ्याच वेळा स्वतःला माफ करत नाही , मग दुसऱ्याचं सोडाच .... आपण कधी कधी मग सुडाच्या भावनेने त्यांच्या परीक्षा बघतो , त्यांना टोमणे मारतो , वाट्टेल तसा वागतो आणि त्यांचा जीवन अवघड करून टाकतो , तरीही ती माणसा , आपल्यावर प्रेम करत राहतात आपल्यासाठी सोसत राहतात आपल्याकरता सहन करतात आणि आपल्याला सर्व काही देत राहतात . ह्या देण्यात काय असता ? प्रेम , वेळ , मानसिक गुंतवणूक , कष्ट सर्व काही ....... इतका सगळा देऊनही आपण पूर्वी काही घडलेला असता ते धरून बसतो आणि स्वतःला कित्ती मोठ्या आनंद पासून मुकावतो .... त्या माणसाचा patience कधीच ढळणार नसतो , कारण त्याची चूक त्याच्या लक्षात येऊन तो अन्ताक्लारानानी बदलून आपल्यावर जीव ओवाळून टाकत असतो .... पुन आपण आपले तसेच , कोरडे ..... विमुक्त , रुक्ष ... ती व्यक्ती रोज रडते , तिला त्रास होतो , त्या व्यक्ती ला आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो .... बर्याचदा त्या व्यक्तीच्या स्वत्वावर आपण घाला घालतो .... घालून पडून बोलतो , वाईट वागतो , पुन ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करत राहते . हे असं का ? हे असं होणं कधी थांबतं मग ? हे असं का होतं? हे असं सगळ्यांबरोबर होतं का ?

तो आला



तो परत आला , ह्या वेळेस वेगळ्या प्रकारे .... मित्र म्हणूनच , पण काहीसा वेगळा .... त्याच्या नसण्यातून असलेली स्थितप्रद्न्यता जाणवली .... आता त्याच्या येण्याने त्याची अलिप्त गुंतवणूक , मैत्रीतही अन अस्तित्वातही . निरपेक्ष जवाबदारी जर आयुष्यात कधी जाणवली असेल तर कळेल माझं म्हणणं . मग ते दररोजचा कार्यक्रम असो किवा आलेला चांगला वाईट अनुभव असो, कि दारूची तल्लफ असो .... सर्व काही निमूट , सदैव , नियमित नि सुरळीत .... मैत्रीतला innocence ani non-judgemental attitude कित्ती महत्वाचा असतो हे अनुभवल्यावाचून न कळण्याच सामर्थ्य नि विचार त्यानेच नकळत मनात पेरला .... हि कोणीतरी दूरवर 'असण्याची ' शिदोरी तत्काळ संपेल कि पुरून उरेल ह्याची परवा न करण्यात बेफिकारी नाही ..... एक विश्वास आहे . काय माहित , काही कैक वर्षांनंतर हा दुवा आमच्या आत्मचरित्राचा एक छान खास chapter बनेल . अशी अपेक्षा नाही , hope सुद्धा नाही ..... एक संभावना आहे . बरं मी काही उठून विशेच त्याच्या बद्दल लिहाव अस काय special ? कि ते special नाही म्हणून लेखी नोंद ठेवावी ...? तर तस काहीच नाही . केवळ दखल म्हणून नाही तर मनापासून वाटता म्हणून हे लिहिल ..... मग भले ते त्याचा दारू पिणं असू देत नाहीतर recently coincidently माझी 'दारू ' ह्या विषयावरची ठाम मत असू देत . हा विरोधाभास महत्वाचा , मज्जेचा नि खास स्वतःचा आहे ..... हे गोड आहे , निरागस आहे , आमच आहे नि हव हवस आहे .... हे मैत्र आहे .... आता हा प्रवास निरव नि शांतपणे आत धडधडत राहील .... जिवंतपणे .... निरंतर ..... अनुभावानुरूप ..... श्रीमंत करत.... माझ्यासाठी ....

Monday, November 2, 2009

Gift of love...



I am literally spoiled by my love who gifted me an annual subscription to Vogue. There r people who r well aware of high life and ultra luxury elegant but mindless reading stuff. Most fashion magazines fit the bill but Vogue is a trend setting mag, one who preaches the fashioniastas the dos and donts of style. The success stories of the iconic gorgeous gods and goddess along with the who's who of the glam world... uber chic and revolutionizing stories of walking talking sleeping eating drinking and living beauty... its all about crisp modernism with soft contemporary tactile of ethereal classics... all together in a smooth gloss package called VOGUE... Thanks Love!