Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Thursday, November 5, 2009

तो आला



तो परत आला , ह्या वेळेस वेगळ्या प्रकारे .... मित्र म्हणूनच , पण काहीसा वेगळा .... त्याच्या नसण्यातून असलेली स्थितप्रद्न्यता जाणवली .... आता त्याच्या येण्याने त्याची अलिप्त गुंतवणूक , मैत्रीतही अन अस्तित्वातही . निरपेक्ष जवाबदारी जर आयुष्यात कधी जाणवली असेल तर कळेल माझं म्हणणं . मग ते दररोजचा कार्यक्रम असो किवा आलेला चांगला वाईट अनुभव असो, कि दारूची तल्लफ असो .... सर्व काही निमूट , सदैव , नियमित नि सुरळीत .... मैत्रीतला innocence ani non-judgemental attitude कित्ती महत्वाचा असतो हे अनुभवल्यावाचून न कळण्याच सामर्थ्य नि विचार त्यानेच नकळत मनात पेरला .... हि कोणीतरी दूरवर 'असण्याची ' शिदोरी तत्काळ संपेल कि पुरून उरेल ह्याची परवा न करण्यात बेफिकारी नाही ..... एक विश्वास आहे . काय माहित , काही कैक वर्षांनंतर हा दुवा आमच्या आत्मचरित्राचा एक छान खास chapter बनेल . अशी अपेक्षा नाही , hope सुद्धा नाही ..... एक संभावना आहे . बरं मी काही उठून विशेच त्याच्या बद्दल लिहाव अस काय special ? कि ते special नाही म्हणून लेखी नोंद ठेवावी ...? तर तस काहीच नाही . केवळ दखल म्हणून नाही तर मनापासून वाटता म्हणून हे लिहिल ..... मग भले ते त्याचा दारू पिणं असू देत नाहीतर recently coincidently माझी 'दारू ' ह्या विषयावरची ठाम मत असू देत . हा विरोधाभास महत्वाचा , मज्जेचा नि खास स्वतःचा आहे ..... हे गोड आहे , निरागस आहे , आमच आहे नि हव हवस आहे .... हे मैत्र आहे .... आता हा प्रवास निरव नि शांतपणे आत धडधडत राहील .... जिवंतपणे .... निरंतर ..... अनुभावानुरूप ..... श्रीमंत करत.... माझ्यासाठी ....

No comments:

Post a Comment