Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Thursday, November 5, 2009

भूमिका



आयुष्यातली स्थित्यंतरं खरतर खूप असतात , पण काही फार वाट पाहायला लावतात , परीक्षा घेतात नी मोठं करून जातात ... आपल्या माणसाला क्षमा करायला फक्त एक विचार करावा लागतो . आपण तर बऱ्याच वेळा स्वतःला माफ करत नाही , मग दुसऱ्याचं सोडाच .... आपण कधी कधी मग सुडाच्या भावनेने त्यांच्या परीक्षा बघतो , त्यांना टोमणे मारतो , वाट्टेल तसा वागतो आणि त्यांचा जीवन अवघड करून टाकतो , तरीही ती माणसा , आपल्यावर प्रेम करत राहतात आपल्यासाठी सोसत राहतात आपल्याकरता सहन करतात आणि आपल्याला सर्व काही देत राहतात . ह्या देण्यात काय असता ? प्रेम , वेळ , मानसिक गुंतवणूक , कष्ट सर्व काही ....... इतका सगळा देऊनही आपण पूर्वी काही घडलेला असता ते धरून बसतो आणि स्वतःला कित्ती मोठ्या आनंद पासून मुकावतो .... त्या माणसाचा patience कधीच ढळणार नसतो , कारण त्याची चूक त्याच्या लक्षात येऊन तो अन्ताक्लारानानी बदलून आपल्यावर जीव ओवाळून टाकत असतो .... पुन आपण आपले तसेच , कोरडे ..... विमुक्त , रुक्ष ... ती व्यक्ती रोज रडते , तिला त्रास होतो , त्या व्यक्ती ला आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो .... बर्याचदा त्या व्यक्तीच्या स्वत्वावर आपण घाला घालतो .... घालून पडून बोलतो , वाईट वागतो , पुन ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करत राहते . हे असं का ? हे असं होणं कधी थांबतं मग ? हे असं का होतं? हे असं सगळ्यांबरोबर होतं का ?

No comments:

Post a Comment