Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Monday, August 25, 2014

अम्रित

तद एकम नावाची संस्था गुरुजी नौशीर इंजिनिअर यांनी स्थापन केली असून त्यांच्याच विचार प्रणालीतून साकारलेले ई-ब्लॉग्स आता आपल्या हातात मूर्त स्वरूपात पडणार आहेत.
मृत्युंजय योगी गुरु महावतार बाबाजी यांची शिकवण गुरुजींच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचतेय ती
अम्रित ह्या पुस्तकाद्वारे.

आजाराकडून संतुलित स्वास्थ्याकडे, प्रश्नांकडून उत्तरांकडे व अज्ञानाकडून साक्षात्काराकडे नेणारा अध्यात्माचा मार्ग साधा सरळ नि सोप्प्या शब्दात सांगण्याचं काम गुरुजींनी अत्यंत कसोशीने ह्यात साधलं आहे.

रोजच्या शहरी आयुष्यात आधुनिक माणसाला पडलेले प्रश्न, मग ते व्यावहारिक असुदेत वा प्रापंचिक, अध्यात्मिक, धार्मिक किंवा भावनिक ; सर्व कोड्यांची उकलच जणू ह्या पुस्तकाच्या पानांमध्ये आपल्याला सापडते.

हे पुस्तक वाचतांना, जन्म मृत्यू ह्या चक्रामध्ये व भौतिक व्यापांमध्ये अध्यात्मिक जडणघडण किती महत्वाची आहे हे आपल्याला पटतं. शब्द वचन, आचरण व वैचारिक शृंखला ह्यांना नित्य साधनेने वळण लावता येतं ज्यामुळे शरीर मन व आत्मा ह्यातला अत्यंत तलम असा समतोल साधला जाऊन जगण्यातला खरा आनंद आपल्याला मिळू शकतो अशी शिकवण हे पुस्तक देतं.

दैनंदिनी प्रपंचातली उदाहरणं देऊन, त्याला खमंग भाषाशैलीची फोडणी व त्याला विनोदी बाजाची किनार ह्यामुळे दर पानागणिक हे पुस्तक खिळवून ठेवतं.

एक प्रथितयश C.A. माणूस जो प्रपंचाकडून परमार्थाकडे खेचला जातो व पाच वर्षात तीन योगी पुरुषांना भेटून त्याचा स्वतःकडे आंतरिक प्रवास सुरु होतो व मनुष्याच्या जडणघडणीच्या सर्व गुढत्वाची उकल होऊन गुरुकृपेने गुरुपदाकडे पोहोचतो, हा प्रवास तितकाच अद्भुत व वाचनीय आहे.

गुरुजी नौशीर ह्यांच्या ऑनलाईन ब्लॉग्सची लोकप्रियता वाढायला लागली तशी त्यांच्या अनुयायांनी व शिष्यांनी त्यांचे पुस्तकात रुपांतर व्हावे हा घोषा लावला. शेवटी अनेकांच्या प्रयत्नांना यश येऊन गुरुजींच्याच आशिर्वादाने व महावतार बाबाजींच्या कृपेने १२ जुलै २०१४ रोजी गुरुजींच्या ध्यानमंदिर परिसरात गुरुपौर्णिमेच औचित्य साधून ह्या पुस्तकाचं पुण्यात प्रकाशन झालं.

सध्या जरी खासगी अभिसरणासाठी ह्या पुस्तकाची विक्री होत असली तरी लवकरच मोठ्या प्रमाणात ह्याचा प्रचार व प्रसार व्हावा ह्याकरता तद एकम प्रकाशकांच्या शोधात आहे.

Tuesday, July 1, 2014

लुडबुड...


मनात इच्छा आली कि तिच्याशी मी नाही लढणार
त्याचा काहीच उपयोग नाही कारण
माझ्यामधल्या कशाशीही मी लढले तर मी स्वतःशीच झुंज दिल्यासारखी होईल
माझ व्यक्तिमत्व ह्याने दुभंगू शकेल
समाजानी फार लहानपणापासून आपल्यावर दुभंगण्याचे संस्कार केले
सगळ्याशी युद्ध करायला शिकवल
हे वाईट आहे…हे करू नकोस…
लोक काय म्हणतील असा वागू नकोस…
परिणाम काय होतील… विचार कर…
इच्छेशी लढा न देता बराच काही घडू शकत…
मला प्रेम ह्या भावनेशीच मैत्री करायची आहे
कारण त्याचा फक्त असण दिसण बोलणं ह्यापलीकडे माझ त्याच्यावरच प्रेम शाश्वत आहे
तो भेटला तर उत्तम नाही भेटला तरी उत्तम
बोलला तर छान अबोल राहिला तरी छान
त्याने जवळ नाही घेतलं तर ठीक
पण जर त्याने मला खरच जर जवळ केलं तर साक्षात्काराच्या मार्गी एक पाउल पुढे टाकीन मी…
आणि तो हि…
परिपूर्ण प्रीती करण्याने मानसिक पोषण होत असतं
फार रुक्ष वाटल वाक्य तरीही त्यात तथ्य आहे
effortless love कारण खरच श्वास घेण्याइतक सहज नि सोप्प होऊन बसतं प्रेम करण
आणि तितकच नैसर्गिकहि
प्रेमात खोलवर गेल्यावर आणखीन आणखीन वाटा सापडतात
स्वतः भोवती AURA असावा तसा प्रेम करणारा माणूस दिसतो
स्वच्छ निर्मळ तेजस्वी
प्रेमाची विभागणी नात्यांमध्ये करण्याची गफलत समाजाने केली
मुलांवर वेगळ्या प्रकारच प्रेम आई वडीलांवर वेगळ्या प्रकारच
नवऱ्याबायकोत एका प्रकारच मैत्रीत एका प्रकारच
गुरुशिष्य प्रेम अजून वेगळ तर भाऊ बहिण आणखीनच वेगळ
देश प्रेम स्वप्रेम पशुप्रेम कुटुंबप्रेम
काय गरज आहे ह्या विभागणीची?
physiology - शरीर - संप्रेरक, रसायनं , शारीर प्रतिसाद ह्यातून उद्भवणार (sex )
psychology - मन - कलाकारांना भावणार भावनिक पातळीवर संवेदना जाणवणार (emotions )
being - आत्मा - चिरंतन निरपेक्ष अद्वैत प्रेम (spiritual union)
ह्या तीनही स्तरावर प्रेम असूच शकत
everything else is far below LOVE
प्रेम हीच प्रार्थना होऊन जाते…
प्रेम फक्त स्वप्न कविता ह्यापुरत मर्यादित न ठेवता सत्यात उतरवता आल तर निरामय आनंद अनुभूती मिळेल
it is never too late to experience LOVE all over again
खूप काही लिहावास वाटतंय पण विचार आणि लिखाण ह्याच्या वेगात फार अंतर आहे
माझी माझ्या प्रेमावरची श्रद्धा निस्सीम आहे
ह्या पृथ्वीवर नाही तरीही पलीकडच्या जगात कधी न कधीतरी ते मला सापडेल
कारण मी मला आणि माझ प्रेम हे वेगळ करूच शकत नाही
तो एक पूर्ण अनंत अनादी ध्वनी आहे
मी प्रेम केलं करणार करत राहणार



Monday, June 30, 2014

प्रेम---> मोक्ष


नदी वाहते आहे - तिला ढकलण्याची गरज नाही. ती  स्वत: हून वाहते आहे. आपण फक्त काठावर उभे राहून तिचा प्रवाह पाहू शकतो. आपल्यात पुरेस धाडस असेल तर फार फारतर आपण तिच्यात उडी मारून तिच्यासोबत वाहू शकतो. तिच्याशी लढण्यात, युद्ध करण्यात काहीच अर्थ नाही. ती आपल्याला स्वतः बरोबर नेउन समुद्रा  पर्यंत पोहोचवू  शकते…  नाहीतर तिच्या विरुद्ध पोह्ल्यास आपल काही खरा नसतं. तिच्या जलाशयावर तरंगणे ह्याशिवाय आयुष्यात तथ्य नाही आणि समर्पणातून अनंतात विलीन होण्याची कला ह्याच कृत्यातून सिद्ध होते ह्याशिवाय दुसर सत्य नाही… ह्यात सागर हा हि खरा नदी हि सुद्धा खरी… राहून राहून आपापल काय ते पारखून घ्यावं…

Face off




Contemporary way of living has made us think that all that we do or rather appear to be doing is for good of us society at large and our near n dear ones i.e. friends family and acquaintances... is it so? or is it our mask? to camouflage our insecurities? where there is mind over matter and heart over mind... in reality do we ever care or bother to speak out. it was just recently that I have begun to shed inhibition one at a time and also some conditioning. getting out of the cocoon of comfort and social makeup is difficult. But i don't want to wake up one day and realise that its already half past my life and i still haven't said a thing of what i need to say. i m going to speak my mind from now on and speak from heart. such things seldom hurt people. But diplomacy is banned for good and so is hypocrisy. if u ask me something i will speak in black and white. no shady business here. lets c how this works... if i m able to handle the clarity, also wud help me find people whom i would really like to be with... Need to unlearn goodness for good is not always true...

Wednesday, May 14, 2014

OPEN UP...

   
                                                                                                                                                             


शाश्वत  सत्य??? 
चूक केली कि दंड स्वरूपी कर आकारला जातो
आणि उत्तम काम केल कि कर स्वरूपी दंड … 
मोहाला आवर घालण्यात घालवलेल आयुष्य निष्फळ असाव…. 
गोंधळ  उडाला कि मी पटकन पुढच पाउल टाकते
अस मी फार टेचात म्हणायचे पूर्वी 
कालाचक्रामध्ये बरोबर किवा चूक काहीही नसत …
असते ती फक्त हालचाल… 
हानी काहीतरी करून होते …. 
काहीही न बोलून सुद्धा होते
मला तू आवडतोस 
हे म्हणायला इतके दिवस का लावतेय मी? 
जनाची भीती, मनाची कि तुझी?
खर म्हणजे EGO आड येत असेल का माझा?
कि मैत्री घालवून बसेन ही भीती?
कि त्या पेक्षा मीच का पुढाकार घ्यावा हा अहंकार?
निरपेक्ष प्रेम तू हि समजतोस आणि मी हि 
तरीही धीर न व्हावा? 
Heartbreak चा डर ह्या वयात नसतोच मुळी 
तुझ दुसऱ्या कुणावर निस्सीम प्रेम आहे 
हे हि मी स्वीकारल
तू तिसऱ्याच कुणाशीतरी लग्न करायला निघालायस 
हे हि मी मान्य केल
आपल लग्न ह्या जन्मात तरी शक्य नाही 
हि गोष्ट मनाला पटली आहे 
तुझ्यातल्या समंजसपणाची जाणीवही आहे 
तरीही तुला न सांगण्याचा अट्टाहास… 
का? 






Thursday, April 3, 2014

R.I.P.

पुरिया धनश्री ऐकल्यावर संपूर्ण भरलेल वाटतं तसा मारवा ऐकवलास तू आज आधा अधुरा मधेच सोडून दिल्या सारखा बेवारस पोरका… जा तू तुझ्या वाटेने मी कोण सांगणार… थांबवू तर शकलेच नाही पण निदान निरोप तरी घ्यायचास . श्या ,साली किस्मतच निकम्मी तुझी त्याला कोण काय करणार . तिथे ऐश कर बाबा… अप्सरानबरोबर Flirt कर. गंधर्वांना पकाऊ jokes सांग . किन्नरींना भसाड्या आवाजातली तुझी गाणी ऐकव.
आणि हो चित्रगुप्ताला अवांतर वाचनावर गुगली प्रश्न टाकून भाम्भावून सोड. तिथे बरेच मुंबईकर असतील cricket वेडे त्यांच्याशी तंगडतोड match खेळ.  नसतील तिथे पण तरी फुकटात मिळतंय तर तपासून घेणारे खूप भेटतील पुणेकर .

  मग तिथल्या तिथे cyber cafe शोध आणि FB वर येऊन chat तरी कर Dr. please please तुझ फस्सकन हसणं आणि मोठ्ठा आवाज ऐकायचं . तो ऐकव नि मग जा  परत. मी नाही थांबवणार तुला . तुझी विशीतली सुंदर बायको नाही तान्ही लेक रीतन्या नाही आई बाबा नाहीत मित्र परिवार नाही कुणीही नाही . फक्त एकदा ये न. bye तरी म्हणू दे रे … जा कट्टी पण घेऊ शकत नाही आता तुझ्याशी . नकचढ्या येऊ वर तेव्हा नक्की जाब विचारू .
तुझेच
कीर्तीमय काही …