Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Monday, August 25, 2014

अम्रित

तद एकम नावाची संस्था गुरुजी नौशीर इंजिनिअर यांनी स्थापन केली असून त्यांच्याच विचार प्रणालीतून साकारलेले ई-ब्लॉग्स आता आपल्या हातात मूर्त स्वरूपात पडणार आहेत.
मृत्युंजय योगी गुरु महावतार बाबाजी यांची शिकवण गुरुजींच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचतेय ती
अम्रित ह्या पुस्तकाद्वारे.

आजाराकडून संतुलित स्वास्थ्याकडे, प्रश्नांकडून उत्तरांकडे व अज्ञानाकडून साक्षात्काराकडे नेणारा अध्यात्माचा मार्ग साधा सरळ नि सोप्प्या शब्दात सांगण्याचं काम गुरुजींनी अत्यंत कसोशीने ह्यात साधलं आहे.

रोजच्या शहरी आयुष्यात आधुनिक माणसाला पडलेले प्रश्न, मग ते व्यावहारिक असुदेत वा प्रापंचिक, अध्यात्मिक, धार्मिक किंवा भावनिक ; सर्व कोड्यांची उकलच जणू ह्या पुस्तकाच्या पानांमध्ये आपल्याला सापडते.

हे पुस्तक वाचतांना, जन्म मृत्यू ह्या चक्रामध्ये व भौतिक व्यापांमध्ये अध्यात्मिक जडणघडण किती महत्वाची आहे हे आपल्याला पटतं. शब्द वचन, आचरण व वैचारिक शृंखला ह्यांना नित्य साधनेने वळण लावता येतं ज्यामुळे शरीर मन व आत्मा ह्यातला अत्यंत तलम असा समतोल साधला जाऊन जगण्यातला खरा आनंद आपल्याला मिळू शकतो अशी शिकवण हे पुस्तक देतं.

दैनंदिनी प्रपंचातली उदाहरणं देऊन, त्याला खमंग भाषाशैलीची फोडणी व त्याला विनोदी बाजाची किनार ह्यामुळे दर पानागणिक हे पुस्तक खिळवून ठेवतं.

एक प्रथितयश C.A. माणूस जो प्रपंचाकडून परमार्थाकडे खेचला जातो व पाच वर्षात तीन योगी पुरुषांना भेटून त्याचा स्वतःकडे आंतरिक प्रवास सुरु होतो व मनुष्याच्या जडणघडणीच्या सर्व गुढत्वाची उकल होऊन गुरुकृपेने गुरुपदाकडे पोहोचतो, हा प्रवास तितकाच अद्भुत व वाचनीय आहे.

गुरुजी नौशीर ह्यांच्या ऑनलाईन ब्लॉग्सची लोकप्रियता वाढायला लागली तशी त्यांच्या अनुयायांनी व शिष्यांनी त्यांचे पुस्तकात रुपांतर व्हावे हा घोषा लावला. शेवटी अनेकांच्या प्रयत्नांना यश येऊन गुरुजींच्याच आशिर्वादाने व महावतार बाबाजींच्या कृपेने १२ जुलै २०१४ रोजी गुरुजींच्या ध्यानमंदिर परिसरात गुरुपौर्णिमेच औचित्य साधून ह्या पुस्तकाचं पुण्यात प्रकाशन झालं.

सध्या जरी खासगी अभिसरणासाठी ह्या पुस्तकाची विक्री होत असली तरी लवकरच मोठ्या प्रमाणात ह्याचा प्रचार व प्रसार व्हावा ह्याकरता तद एकम प्रकाशकांच्या शोधात आहे.

No comments:

Post a Comment