मनात इच्छा आली कि तिच्याशी मी नाही लढणार
त्याचा काहीच उपयोग नाही कारण
माझ्यामधल्या कशाशीही मी लढले तर मी स्वतःशीच झुंज दिल्यासारखी होईल
माझ व्यक्तिमत्व ह्याने दुभंगू शकेल
समाजानी फार लहानपणापासून आपल्यावर दुभंगण्याचे संस्कार केले
सगळ्याशी युद्ध करायला शिकवल
हे वाईट आहे…हे करू नकोस…
लोक काय म्हणतील असा वागू नकोस…
परिणाम काय होतील… विचार कर…
इच्छेशी लढा न देता बराच काही घडू शकत…
मला प्रेम ह्या भावनेशीच मैत्री करायची आहे
कारण त्याचा फक्त असण दिसण बोलणं ह्यापलीकडे माझ त्याच्यावरच प्रेम शाश्वत आहे
तो भेटला तर उत्तम नाही भेटला तरी उत्तम
बोलला तर छान अबोल राहिला तरी छान
त्याने जवळ नाही घेतलं तर ठीक
पण जर त्याने मला खरच जर जवळ केलं तर साक्षात्काराच्या मार्गी एक पाउल पुढे टाकीन मी…
आणि तो हि…
परिपूर्ण प्रीती करण्याने मानसिक पोषण होत असतं
फार रुक्ष वाटल वाक्य तरीही त्यात तथ्य आहे
effortless love कारण खरच श्वास घेण्याइतक सहज नि सोप्प होऊन बसतं प्रेम करण
आणि तितकच नैसर्गिकहि
प्रेमात खोलवर गेल्यावर आणखीन आणखीन वाटा सापडतात
स्वतः भोवती AURA असावा तसा प्रेम करणारा माणूस दिसतो
स्वच्छ निर्मळ तेजस्वी
प्रेमाची विभागणी नात्यांमध्ये करण्याची गफलत समाजाने केली
मुलांवर वेगळ्या प्रकारच प्रेम आई वडीलांवर वेगळ्या प्रकारच
नवऱ्याबायकोत एका प्रकारच मैत्रीत एका प्रकारच
गुरुशिष्य प्रेम अजून वेगळ तर भाऊ बहिण आणखीनच वेगळ
देश प्रेम स्वप्रेम पशुप्रेम कुटुंबप्रेम
काय गरज आहे ह्या विभागणीची?
physiology - शरीर - संप्रेरक, रसायनं , शारीर प्रतिसाद ह्यातून उद्भवणार (sex )
psychology - मन - कलाकारांना भावणार भावनिक पातळीवर संवेदना जाणवणार (emotions )
being - आत्मा - चिरंतन निरपेक्ष अद्वैत प्रेम (spiritual union)
ह्या तीनही स्तरावर प्रेम असूच शकत
everything else is far below LOVE
प्रेम हीच प्रार्थना होऊन जाते…
प्रेम फक्त स्वप्न कविता ह्यापुरत मर्यादित न ठेवता सत्यात उतरवता आल तर निरामय आनंद अनुभूती मिळेल
it is never too late to experience LOVE all over again
खूप काही लिहावास वाटतंय पण विचार आणि लिखाण ह्याच्या वेगात फार अंतर आहे
माझी माझ्या प्रेमावरची श्रद्धा निस्सीम आहे
ह्या पृथ्वीवर नाही तरीही पलीकडच्या जगात कधी न कधीतरी ते मला सापडेल
कारण मी मला आणि माझ प्रेम हे वेगळ करूच शकत नाही
तो एक पूर्ण अनंत अनादी ध्वनी आहे
मी प्रेम केलं करणार करत राहणार
No comments:
Post a Comment