Wednesday, January 20, 2010
त्रिवेणी स्वरानुभव
अत्यंत गोड आवाज, १२ पट्यांमधे संवादिनी वाजवायची कसब, उत्तमोत्तम स्वररचना बांधायची दैवी देणगी व आपली कला अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोचेल हा एक कलाकार अणि संगीत शिक्षक म्हणुन चाललेला सतत विचार करणारे थोर जेष्ठ श्री. दत्तात्रेय काणे ह्यांनी स्थापन केलेल्या दत्त संगीत विद्यालयाच्या वर्धापन दिनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा योग आला आणि माझी ओळख एका संगीतबद्ध घराण्याशी झाली. श्री. दत्तात्रेय काणे ह्यांना मा. कृष्णराव फुलंबिकर ह्यांचे शिष्य. संगीत क्षेत्रात मुक्तपणे विहार करत त्यांनी आपले अवघे आयुष्य व्यतीत केले. ९४ व्या वर्षी देखिल त्यांची संगीताबद्दल्ची उर्मी थक्क करणारी आहे. त्यांचा कलावारासा त्यांची मूल नातवंड पुढे चालवत आहेत. मुलगी सौ. माधवी सोमण, मुलगा श्री. दीपक काणे व नातवंड अमित व अमृता सोमण संगीताराधना करत आहेत. ८ नवम्बर २००९ ला बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे रंगमंदिरात त्रिवेणी कार्यक्रम पार पडला अणि तो म्हणजे THINK MUSIC COMPANY च्या RECORD LABEL च उदघाटन, इंद्रधनू ह्या लहान मुलांच्या गाण्यांच्या CD च प्रकाशन आणि दत्त संगीत विद्यालायाचा वर्धापनदिन. सौ. माधवी सोमण ह्यांचे सुपुत्र श्री. अमित सोमण ह्यांचे स्वप्न म्हणजे स्वतःची एक Music Company असावी. त्या स्वप्नातुनाच साकार झाली THINK MUSIC COMPANY . श्री. अमित सोमण हे खरतर अभियांत्रिकी क्षेत्रातले पण संगीताची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणुन मग इंटरनेट वरुन रेकॉर्डिंग संबंधिची अधिकाधिक माहिती काढून स्वतः रेकॉर्डिंग करायला शिकले. त्यानंतर Music Arrangement , स्टूडियो Acoustics संबंधी ज्ञान संपादन केले आणि स्वतःचा स्टूडियो काढला. हे करता करता स्वतः Composor म्हणुन त्यांनी The Chaplet of Divine नावाचा एल्बम प्रकाशित केला आणि हे करता करता THINK MUSIC COMPANY & RECORD LABEL जन्माला आल. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री. विनोद घोसाळकर व प्रभाग समिति अध्यक्ष, नगरसेवक माननीय श्री. भालचंद्र म्हात्रे लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व अमृता सोमण हिच्या शारदा स्तावानाने झाली. Music Company च उदघाटन माननीय श्री. घोसाळकर साहेब व माननीय श्री. म्हात्रे साहेब ह्यांच्या हस्ते झाल. ह्या कंपनीच पहिल प्रोजेक्ट म्हणुन 'इंद्रधनू' नावाची बलागीतांची CD मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. ह्या CD मधे ७ विविध मूड्सची बालगीत आहेत. सीडीतील गाण्यांची शब्दरचना व संगीत सौ. माधवी सोमण ह्याची. गाणी रचताना श्री. अमित सोमण ह्यांची मोलाची साथ त्यांना लाभली. सौ. माधवी सोमण सध्या दहिसर येथे दत्त संगीत विद्यालय चालवितात व तेथे संगीत शिकवितात. गेली ३० वर्ष त्या संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या बरोबर त्यांची कन्या संगीत विशारद कु. अमृता ही विद्यालायत संगीत शिकवते. त्यानंतर 'इंद्रधनू' सीडीतील सर्व गाण्यांवर बसवलेल्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली. पहिल प्रोजेक्ट म्हणुन बालागीतांचीच सीडी का? असा प्रश्न विचारल्यावर श्री. सोमण म्हणाले की कुठली ही गोष्ट लहानापसून मोठी होते म्हणुनच आधी बाल मित्रांसाठी सीडी करायची असा ठरल. त्यावर सौ. सोमण म्हणल्या की पुढे व्हिडियो सीडी आणि सुगम तथा शास्त्रीय संगीताच्या सीडी काढण्याचा आमचा मानस आहे. मध्यन्तारानंतर दत्त संगीत विद्यालयाच्या सुगम संगीत व रागदारी गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांची मुलाखत घेताना माझ्या लक्षात आल की बुजुर्ग लोकांचा आर्शीवाद घेउन नव्या कलाकारांना प्रोत्साहन ध्यावे ही उदात्त भावना मनात ठेउन सोमण कुतुम्बिय पुढे जात आहेत. महाराष्ट्रियन असल्याने व ओघानेच मराठी वरच्या प्रेमापोटी पहिली सीडी त्यांना मात्रुभाषेतच केली. पुढे इतर भाषांमधेही त्यांना प्रोजेक्ट्स करण्याच्या शुभेच्छा. जुन्या अजरामर बालागीताना आज ह्या नव्या आजच्या आणि realistic बालगीतांची साथ लाभणार आहे हे पाहून बर वाटत. NICK आणि CARTOON NETWORK वरुन चाललेली वादातीत चर्चा आपण वाचत आहोतच, त्यावरून मुलांना HEARING आणि LISTENING मधला फरक कलावा ह्या हेतूने ही सीडी फार मदत करणार आहे. सीडीतली गाणी फ्रेश वाटतात. आजच्या मुलांच्या माहितीतले शब्द "Kurkure , mummy , daddy , bye bye " ह्यामुले त्यांना गाणी जवळची वाटतात. गाण्यातल्या पावसाला एक पैसा पुरत नाही त्याला एक रुपैय्या द्यावा लागतो आणि तेवढ करून पुरत नाही त्याला पाणीपुरी भेलपुरीच अमिष दाखवाव लागत. पावसाने फक्त मडक न भरता आता तलाव भरला पाहिजे आणि घामाच्या धारांमधून मुंबईकर लोकांना सोडवल पाहिजे अशी मागणी हे लहान दोस्त करतात. काही गाणी गड गड गुडुम असे मस्त Phonetic शब्द ऐकवून मज्जा आणतात तर काही गाण्यातला ससा आईकडे चिप्स, चॉकलेटचा हट्ट करतो, त्याला चालायची सवय नसल्याने त्याचे पाय दुखतात आणि शाळेत जायचा त्याला भयंकर कंटाळ! येतो. PICNIC ह्या गाण्यात निसर्गाची मज्जा आणि सहलीची गम्मत अनुभवता येते तर 'डासोबा चावरे' ह्या गाण्यात डासाच्या मावशी व भाच्च्याशी ओळख होते आणि आपण जातो थेट त्याच्या fitness च्या दुकानात, रक्ताचा हिशेब मागायला... 'फुलांसारखे पुलट रहावे' हे गाण मुलांवर चांगले संस्कार करत तर शेवटच 'इंद्रधनू' हे गाण सातही स्वरांच्या सरगम चालीनी मनाला रंगवून टाकत. ह्या संपन्न कार्यक्रमच निवेदन मला करता आल हे माझ भाग्य. THINK MUSIC COMPANY , 'इंद्रधनू' आणि दत्त संगीत विद्यालायाला मनःपूर्वक शुभेच्छा!!! ---- प्राजक्ता साठे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment