Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Wednesday, July 8, 2009

Gurupournima

natraj.gif (391×474)
काल गुरु पौर्णिमा होती, एक गुरु आणि एक शिष्य ह्या दोन्ही भूमिकांमधून मी गेलेली आहे आणि जातेय. तो मार्ग बराच वेगळा आहे. दोन्ही भूमिकांमधून एकत्र, एकाच वेळी जातांना अशी जाणीव होते कि जगातल्या माणसांमधे जी नाती निर्माण होतात,त्यातलं माय-लेकरानइतकच अत्युच्च आणि समृद्ध नातं आहे. मी माझे अनुभव लिहितेय, एक गुरु म्हणून आणि एक शिष्य म्हणून. कालचा समारंभ: गुरु पौर्णिमेच्या अत्यंत सुरेख आठवणी घेऊन मी माझ्या क्लासमधे गेले. मुलींनी क्लासचा हॉल सुंदर फुलांनी भरून टाकला होता. इतका,कि फुलांमधून वाट काढत; मला आत शिरावं लागलं.मोगरा, चमेली, जाई, जुई, चाफा अशा एकाहून एक सुगंधांनी हॉल मोहरून गेला होता. त्यातच झेंडूच्या फुलांच्या तोरणांचा घमघमाट, शेवंतीच्या आणि अस्तरच्या फुलांनी काढलेली सुरेख रांगोळी, गुलाब निशिग्न्धाच्या फुलांचे गुच्छ,जागो जागी धूप, उदबत्त्या , अत्तरांचा सुवास, त्यातूनच भर पावसात गुलाब पाण्यानी केलेला सुखद वर्षाव. ह्या सर्व गोष्टींनी भरून येत होतं सारखं. अहो आश्चर्य! हॉल मधे शिरतांना मला ह्या पोरींनी फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या!!! एन्ट्रीलाच इमोशोन्ल सीन करून आम्ही सगळे मोकळे झालो. माझ्या गोजिरवाण्या नाचऱ्या मुली आणि त्याहूनही उत्साही त्यांचे पालक. सुगंधांच्या दुनियेत सुवासाच्या पावलांनी प्रवेश करून मी आत पोहोचले, तेव्हा गर्भरेशमी आसनावर ठेवलेली नटराजाची फुलांनी सजलेली लखलखीत मूर्ती बघून माझे भानच हरपले. समोर तुपातली पंच -निरांजनं त्यांचा स्निग्ध प्रकाश आणि दोन उंच चांदीच्या मंद तेवणाऱ्या समया. त्यात उजळून, अद्वितीय दिसणारा नटराज. काय ते तेज! मी काही क्षण बघतच राहिले त्या मूर्तीकडे. जणूकाही तो आत्ता हातातला डमरू 'डीम डीम डीमकत' करून नाचू लागेल इतकं खरं होतं सगळं. गुरुंच्या अंतर्मनाला साद कशी घालता येईल आणि त्यांच्यातील कलाकाराला काय भावेल हे कसा काय ओळखलं त्या चिमुरड्या मुलींनी? माझ्या हस्ते नटराज पूजन झालं. गुरुं: ब्रम्हा, गणपती अथर्वशीर्ष , समुद्रवसने देवी ह्या श्लोकांनी हॉल मंत्रमुग्ध झाला. त्या त्या वास्तुचहि आपलं असं भाग्य आणि चैतन्य असतं, जेणेकरून अशा मंगलमय,अत्यंत सुखद आठवणी त्या वास्तूशी जोडल्या जातात. त्यानंतर मुलींनी गुरुं पूजन सुरु केल. गुरुंपूजनात मी दक्षिणा घेणार नाही असं कटाक्षाने सांगितलं होतं आणि माझी गुरुंदक्षिणा हि न्रुत्यप्रस्तुति स्वरुपात असावी असाच माझा आग्रह असल्याने,गुरुं पूजन विधी झाल्यावर मला नृत्याप्रस्तुतीची अनमोल गुरुदक्षिणा मिळाली.आधी माझे पाय धुतले गेले, त्यावर चंदनाचा लेप लावून परत दुधाने धुतले गेले,हळद-कुंकू फूलं वाहून मला नमस्कार करण्यात आला.सगळ्या मुलींनी आणि पालकांनी मला पंचारतीने ओवाळले. खणा-नारळाने माझी ओटी भरली . शिक्षण क्षेत्रात इतका समृद्ध करणारा अनुभव रोजच्या रोज आपण घेतो हि भाग्याची गोष्ट आहे. मी तर म्हणीन कि आज सर्व क्षेत्रातील सर्वात भरभरून समाधान देणारं हे क्षेत्र आहे.मानसिक आणि शारीरिक दृष्टीने समृद्ध करणारी नृत्यासारखी कला नाही. नंतर मुलींनी आपापले पेर्फोर्मंस सुरु केले. त्यांनी स्वतः बसवलेली नृत्य सादर करतांना त्यांना, त्यांच्या पालकांना आणि मला फार अभिमान वाटत होता. अभिमान, आपल्या कलेचा, आपल्या समृद्ध परंपरेचा. श्री. रामचंद्र कृपाळू भज मन , ठुमक चलत रामचंद्र, ह्या भजनांपासून; आज गोकुळात रंग खेळतो हरी, साधी भोळी मीरा तुला कळली नाही ह्या चित्रपटगीतांपर्यंत; लावणी, गोंधळ पोवाडा युगुल्न्रुत्य, श्लोक, लोकगीत; सगळ्यांवर नृत्य प्रस्तुती झाली. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आय-पॉड वर एकानंतर एक गाणी घेऊन ती स्पीकर्सला जोडली गेल्याने सीडी घालून काढून घालून गाणी पुढे मागे करण्याचा वेळ वाचला.त्यामुळे कार्यक्रमही पद्धतशीर आणि आटोपशीर झाला. तीन तासाच्या ह्या बहारदार गुरुं पौर्णिमेच्या कार्यक्रमाने मला अविस्मारनिय आठवणी दिल्या. मग आम्ही सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. मजा मस्ती मस्करी आणि नकलांनी जेवणाला लज्जत आली. उत्कृष्ट बेतावर दमलेल्या मुलींनी,पालकांनी आणि मी ताव मारलाच. त्या नंतर काही पालकांनीही स्वतःचे अनुभव आणि प्रतिक्रिया बोलून दाखवल्या. त्यांच्या बोलण्यातून जाणवले कि आजचा पालकवर्ग किती सजग आहे आणि पाल्याच्या लहान आणि संवेदनशील मनांना त्यांनी कित्ती अलगद समजून घेतलय. ते सर्व ऐकून मला जितकं बरं वाटत होतं तितकीच मला वाढलेल्या जवाबदारीची जाणीव झाली. मुली माझ्याचकडे मोठ्या होणार आहेत आणि त्याचं भान मलाही त्यांची एक गुरुं म्हणून,एक मैत्रीण म्हणून आणि त्यांची पालक म्हणून ठेवायला हवं. दररोज मी ज्या मुलीन्बरोबर नृत्यसाधना करते, त्या माझ्या शिष्या, त्यांचे पालक आणि माझ कुटुंब हे हा आता एक मोठ्ठा जिव्हाळ्याचा परिवार झाला आहे. ह्या परिवाराला कलेच्या नात्याची घट्ट शिवण आहे. मी ह्या सगळ्यांहून वेगळी नाहीच आणि हेच करण्यासाठी माझा जन्म झाला आहे हे प्रकर्षाने मला जाणवले. मला गुरुं म्हणताना त्यांना माझ्या बद्दल वाटणारा आदर,हि माझ्या गुरुंमुळे मला मिळालेली अनमोल देणगी आहे आणि ह्याची मला जाणीवहि आहे.गुरुपोर्णिमेच्या ह्या दिवशी माझ्या गुरुंसमोर मी नतमस्तक होते. मला त्यामुळेच कि काय नटराजामध्ये माझे गुरुं आणि माझ्या शिष्या आणि माझ्या शिष्यांमध्ये आणि गुरूंमध्ये नटराज दिसायला लागला आहे.

4 comments:

  1. Thank you very much for sharing your experience with us. While reading this post i am actually in your classroom feeling my presence, fraganance of flowers.I feel like start dancing now.
    Thank you very much prajakta

    ReplyDelete
  2. That must have been an awesome experience for u.. ani tu itkya chaan shabdat tyacha varnan kela ahes ki mala suddha tithe aslyasarkha vatla thoda vel.

    ReplyDelete
  3. hey praju..really nice yaar....Not only that you words were extraordinarily powerful...But I can sense that your heart was speaking it with the words....It would have been really a great day.. I am sure....Students are realy a part of your life and I can say that you love'em all.....Congratulations for getting such a nice family members....N Wish you all the best with you Dance Life....

    ReplyDelete