कारभार टाळक्याचा
आता उरला ना फारखीळ मनालाही बसे
आता सोसावे ना भार
आयुष्याची स्थित्यंतरं
नात्यातले मध्यंतर
जीव तुटे निरंतर
नसे त्याला गत्यंतर
उब आता गारगार
त्रास होई फारफार
कळे न हा कारभार
नशिबाचा फेरफार
दिस जातील हे चार
देव उघडेल दार
काही काळ खाल्ला मार
जगण्याचा कळला सार
No comments:
Post a Comment