Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Friday, July 10, 2009

अनुत्तरीत...

SNN0514FB_682_572682a.jpg (682×400)


गेल्या महिन्यात आम्ही कॉलेज मधल्या मित्र मैत्रिणीनी फार वर्षांनी एकत्र भेटून स्नेह संमेलन करायचं ठरवलं. सगळे, जवळ जवळ ८-९ वर्षांनी भेटत होते. आम्ही सगळे विज्ञान क्षेत्रातले असल्यामुळे, आमच्यातलं कुणी वास्तुविशारद होत, तर कुणी डॉक्टर,काही जण इंजिनियर होती, तर काही जणांनी आपापली क्षेत्र बदलली होती. एखाद दोन जणांनी स्वतःचा व्यवसाय म्हणून काही बिसनेस सुरु केले होते,तर एकीने दुकान काढले होते.एका पठ्याने गोरेगावात हॉटेल काढूनचं जम बसवला होता. काहींची लग्न झाली होती,काही जणांनी आपापसात लग्न करून टाकली होती,तर काहींची ठरायची होती. दोन लग्न ठरलेले बक्रे सुद्धा आले होते, ज्यांना छळायला आम्हाला फार मज्जा येत होती. काही जनांना पोरबाळं झाली होती तर काहींना व्हायच्या मार्गावर होती. काही मैत्रिणी गृहिणी होऊन घर सांभाळत होत्या,तर काही नोकरी आणि घर सांभाळून आपापल्या लहान मुलांना वेळ देत होत्या.एक मैत्रीण भल मोठ्ठ पोट घेऊन आठव्या महिन्यातही त्या स्नेहसम्मेलानाला आली होती. काही मित्रांना टक्कल पडू लागलं होत, तर काहींची पोटं सुटली होती.कुणी दाढ्या वाढल्या होत्या,तर एका मित्राने चक्क केस वाढवून त्यांचा बुचडा बांधला होता. तो सध्या फोटोग्राफी करत होता. संध्याकाळी शिवाजी पार्कात गप्पा झाल्यावर,आम्ही एका छान जागी रात्रीचे जेवायला गेलो. आमचा संचेत नावाचा मित्र काही येऊ शकला नाही. माझी सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला समिराला तो मनापासून आवडायचा,पण तिने त्याला हे कधीच सांगितले नाही. तिने अजूनही लग्न केले नव्हते. तिचे सन्चेतवर प्रेम होते. आजच्या स्नेह्सम्मेलानाला ती त्याला आपल्या भावना सांगणार होती.आम्ही खूप वेळ वाट पहिली, पण तो काही आला नाही.संचेतची खूप आठवण काढत आम्ही त्याला, "येतोस का?" म्हणून एसेमेस केला. त्यावर त्याचा रीप्लाय आला,"काय म्हणताय तुम्ही सगळे? सॉरी मी येऊ नाही शकलो, एका मित्र बरोबर पीत बसलोय. परत केव्हातरी!" आम्ही सगळे क्षणभर गप्प झालो. आमच्यातले बरेच सुन्न झाले. कॉलेजमधे सतत हसत राहणारा, उत्साही, हुशार, हरहुन्नरी आणि आम्हा सगळ्यांचा लाडका मित्र आज काही नशेच्या क्षणांसाठी आम्हाला भेटायला आला नव्हता. आम्हाला हे जरा विचित्रच वाटलं. त्यावर आम्हा सगळ्यांची चर्चा एका वेगळ्याच विषयावर गेली. आमचा हा मित्र एका नामवंत कवीचा मुलगा.घरात साहित्य,संगीत,कला सर्वाला प्रोत्साहन देणारा वातावरण. कॉलेज मध्ये असताना तो मुलींशी खूप आदराने वागायचा आम्हा मुलींना तो सोबत असला कि फार सुरक्षित वाटायचं. तो प्रचंड वेगळ्या पातळीवरची विचारसरणी घेऊन जन्मलेला. दररोज काहीतरी वेगळं करायचं, आपण काहीतरी अद्वितीय करून दाखवायचं हा ध्यास घेऊन जगणारा.शिक्षण संपल्यावर हा जाहिरात क्षेत्रात शिरला तोच मुळी सर्वोच्च स्थान मिळवावा,ह्या जिद्दीने आणि त्या प्रमाणे तो एकेक पायरी चढत वर पर्यंत गेला.त्याच्यासाठी हे सगळं अपेक्षितच होत.पण काही गोष्टी थोड्या वेगळ्या घडत गेल्या, त्याला advertising क्षेत्रातल्या ताणामुळे वाईट सवयी जडल्या. कामाचा ढिगारा आटोपला कि दररोज दारू व्हायची,सतत सिगारेट ओढायची तल्लफ यायची,वेळी अवेळी बाहेरचा वाट्टेलते खायचा. त्याला ना भान होतं वेळेचं,काळाच ना आपण काय करतोय, कुठे जातोय ह्याचं. कलाकृतीसाठी नाविन्य हवं वेगळेपणा हवा,ह्यासाठी तो अनेक स्त्रियांचा सहवास घ्यायला लागला होता. आम्हा प्रत्येकाला त्याची एकेक वाईट बातमी कानावर येत होती. आज काय तर ऑफिस मधल्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न तर उद्या कुणा जुन्या मैत्रिणीला अश्लील एसेमेस. कुणाला इंटरनेटवर पटवून बाहेर घेऊन जाणं नाहीतर कुणा ओळखीच्या मुलीला,"शरिरिक संबंध ठेवशील का?" हे बेधडकपणे विचारणं इतपर्यंत तो चलबीचल झाला होता. कलानिर्मितीसाठी नवनवीन स्त्रीसाहवास मिळावा म्हणून तो काहीही करायला तयार होता.आम्ही हे सगळ समिराला सान्ग्नार होतोच. कारण प्रेमात पड्ल्यामुळॆ तिला त्याचे अवगुण दिसत नव्हते. एकीकडे त्याच्या कलाकृती,जाहिराती,पाहून आम्हाला प्रचंड अभिमान वाटत होता, तर दुसरीकडे त्याच्या मानसिकतेची कीव येत होती. ह्या सगळ्या व्यसनांच्या आहारी जाऊन तो स्वतः कसा जगावं,हे विसरला होता. ना त्याला स्वतःची काळजी होती ना नातेसंबंधांची. त्याला हवं होतं यश. जे आम्हालाही हवं होतं. पण आमचे यश मिळवण्याचे मार्ग वेगळे होते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते हे तो अभिमानाने सांगायचा. पण त्या वाक्यात किती किळासवाणी ओंगळ भावना लपलेली होती हे आम्हाला आज कळलं. त्याच्यासाठी ना मैत्री महत्वाची होती ना माणस. ह्या सगळ्याची हळहळ करत आम्ही जेवण उरकले. थोड्याशा उदास, विषन्न मनाने आम्ही मित्रमैत्रिणींनी एकमेकांचा निरोप घेतला. पुढे काही दिवस बऱ्याच कडूगोड आठवणींवर आम्ही जगत होतो. त्या भेटीची सुखद शिदोरी आमच्या प्रत्येकाला आमच्या सोनेरी दिवसांची आठवण करून देत होती. आजच एक फोने आला. संचेत गेला… वय वर्ष २५च्या आसपासचा अद्वेर्तीसिंग क्षेत्रातला उभारता तारा मावळला. त्याच्या मृत्यूच कारण मात्र कळलं नाही. कुणी सांगितलं लिवर खराब होऊन,तर कुणी म्हणत होत कावीळ झाली म्हणून, कुणी कळवलं इंफेक्षन झाला त्याला,तर कुणी म्हणाला 'दुसरच' काहीतरी झाला होता त्याला. मी ते काही आज लिहिणार नाही. मी आतून हलली आहे. का व्हावा शेवट एका तरुण रक्ताचा? आणि तोहि असा? इतक्या लवकर? का निर्धास्तपणे ह्या मुलाने उधळून द्यावा आपलं आयुष्यं असंच, कारण नसतांना? संचेत आम्हाला हवा होता, समीराला तो हवा होता,तो ह्या जगाला हवा होता. संचेटची कला त्याच्या क्षेत्रात नवे परिमाण ठरणार होती. तो खूप काही करू शकला असता. मी हे लिहित असताना मनात दुख आणि चीड सारखीच उसळून येतेय. का नाही थांबवू शकलो आम्ही त्याला? किवा त्याचे सुजाण आई बाबा?किवा हा समाज? काय चुकलं आमचं?मला हे प्रश्न भेडसावत आहेत. मन विकल झालंय. पण मी आता थांबायला हवं, कारण आज आम्हाला संचेतच्या घरी जायचं आहे. एका कवीच्या घरी,त्यांच्याच कलाकार मुलाच्या जाण्याबद्दल सांत्वान करायला. कोण कुणाचा सांत्वन करणार? कुठपर्यंत? कुणी कुणाला माफ करायचं? कस आणि किती समजवायचं?सगळे प्रश्न अनुत्तरीत...

3 comments:

  1. This is really a sad story. Kharokhar evdhya hushar mulane swatahavar jara control thevla asta tar tyala thodya varshanni akkhya jagane navajla asta.....

    ReplyDelete
  2. hey Prajkta I am really sorry for wht happened...even I lost for some time while reading it....Whtever happpend is really bad...n wht u said is also correct...its unuttaratit????
    I dont know why he did that....but I am sure its not only his control (Or rather uncontrol) that took him where he is rt now... but also the situation around him.....I completely believe that u r where u r...n u become in which surrounding u grow up and not only that but in which group u r 'RT NOW' so u have to not only chose friends very carefully but you have to always be in such group...'Not only those five golden years of life but thrugh out the life'..
    I am happy that my group is really nice....I hope everyone gets the same.....may his soul go in peace....

    ReplyDelete
  3. A person who fails to stop when required,finally ends up with the same tragedy.
    Keep writing.
    It gives lot of satisfaction of creation.
    Keep it up.
    All the best.

    ..Baba

    ReplyDelete