Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Tuesday, March 1, 2016

मी कोण तुझी?

झुंजूमुंजू पहाट काळी
निळी सावळी काया
ठाऊक नसते मज पाहताना
सऱ्या नीशेची माया
निशीदिनी सतत
स्वप्नात
येउनी कृष्ण
भारुनी उष्ण
श्वासांचे तृष्ण
पाझरते स्वप्न
हृदयाचे यत्न
अश्रूंची रत्न
थेंबांच्या आठवणीत
हरवले बिंब तुझे कान्हा
हा प्रेम रोग तान्हा
राधा कि मीरा न कळे
मी कोण तुझी संबंध कसा
नि काय तुझे माझे नाते
वृन्दावनी तयाचा ध्वनी
मधुर रुणझुणी
सरल्या रात्री 
अधिऱ्या गात्री 
जागवला चंद्र
गंधाळले रंद्र
बरसला रंग चांदण्यांचा
गालीचा तरल स्फटिकांचा
मनी स्वप्नांचा ठाव
अधरी कृष्णाचे नाव
लेऊनी साज नृत्य रास
उरी सतत गोविंद श्वास
मनोहर तू मी श्यामसखी
जोगीण मी रागीण मी
कालिया सम नागीण मी
मोक्षाभिलाशी नायिका मी
मृगजळा जवळ घे क्षणी एक
आस ही नेक
प्रियकरा...भगवंता...
नीजू दे मला….

- प्राजक्ता साठे


2 comments: