Thursday, June 23, 2011
पूर्वगंध 1
आज जवळ जवळ ७ वर्ष झाली आपल्याला एकमेकांपासून दूर होऊन. काळ खूप पुढे गेलाय. आपण दोघेही फार पुढे आलोय त्या सगळ्यापासून... पण अजूनही तुझ्याबरोबर घालवला प्रत्येक क्षण ताजा आहे... कधीही न कोमेजणाऱ्या फुलासारखा. मी पाहिलं प्रेम होते तुझी... प्रेम असं हळुवार, इतकं निरागस, खूप हळवं...आणि बरंचस बालवयातल. मला मजा वाटते कि एकमेकांबद्दल तासंतास विचार करणारे आपण दोघे, आज एकमेकांशी दोन मिनिटं सुद्धा धड बोलू शकू कि नाही माहित नाही. कित्ती बदललं रे आपलं जग. आपण नसू कदाचित बदललेले, कदाचित असूही थोडेसे, कुणास ठाऊक? आज मनात बऱ्याच भावना उचंबळून येताहेत. भावना... अलवार, हळहळनाऱ्या, पश्चात्तापाच्या आणि इतरही खूपशा न उमगलेल्या. विचार करत करत मन थेट तुझ्या माझ्या पर्यंत पोहोचतं... जेव्हा आपण नुकतेच तरुणपणात पाऊल टाकत होतो. मी माझ्या शाळेची captain होते नि तू तुझ्या शाळेतला अत्यंत हुशार मुलगा. तुझी शाळा फक्त मुलांची नि माझी फक्त मुलींची... त्यामुळे आपण तसे co - ed ८ वी च्या क्लास मध्ये बावरालेलोच होतो... आपलं पाहिलं क्लास मला आठवतो. तुला तुझी नि मला माझी आई क्लास ला सोडायला आल्या होत्या. क्लास संपेपर्यंत त्या बाहेर आपली वाट पाहत बसल्या होत्या एकमेकींशी गप्पा मारत. पाहिलं lecture ALGEBRA चा होता. आणि तो पूर्ण तास जे काही शिकवलं ते सगळा माझ्या डोक्यावरून गेलं होतं...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment