Sunday, June 26, 2011
नाटकीय रविवार
कान्हा झाल्यापासून पहिल्यांदाच नवरोबांबरोबर नाटक पाहायला गेले courtesy माझे आई बाबा. त्यांनी कान्हुल्याची जबाबदारी घेतली आणि आम्हाला मोकळीक दिली. काय young वाटलाय आम्हाला आज. उगाचच हसत खिदळत होतो आम्ही. कॉमेडी नाटक असल्याने खूप हसायला पण येत होता आम्हाला. आज खरच आमचे pre marriage days आठवले मला. इवेन कान्हा व्हायच्या आधीसुद्धा आम्ही महिन्याला जवळ जवळ २ सिनेमे पाहायचो, hotelling करायचो खूप मजा यायची. आता आई बाबा झाल्यावर आम्ही कान्हा नावाचा गोग्गोड नाटकाच आणलाय घरी. त्यामुळे वेगळ्या नाटकाला जायची गरजच नाही आणि वेळ पण होत नाही. असो तर नाटकाचा नाव "आलटून पालटून" नाटक INTERVAL नंतर GRIP घेतं... खूप refresh झालो आज आम्ही. आता ठरवून टाकलाय, दर महिन्याला एकतरी नाटक पाहायचाच रविवारच. मला मुद्दाम पहायची आहेत अशी जवळ जवळ १० नाटकांची लिस्ट काढली आहे मी. ती नाटक दादरला रविवारची लागावीत हि ईश्वरचरणी प्रार्थना...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment