Wednesday, June 22, 2011
accidently regular ...
कधी कधी अगदी नकळतच खुपचं सक्काळी आपला मूड ऑफ होतो... म्हणजे कारण असं काहीही नसतं मूड जायच... पण काहीतरी trigger असतात तस मनात साठलेल्या सगळ्याचे थर साठत असतात दिवसेन दिवस आपल्या मनावर.... आणि अचानक त्या उकळत्या भावनानंवर वाईट मूड ची साय धरते.... आत मात्र वाईट भावनांची वाफ बाहेर पडू बघत असते.... अशातच कोणीतरी कडी लावत .... गोष्ट असते छोटीशी आणि भडका उडतो.... ब्लास्ट होतो आणि प्रचंड चिडतो आपण... अगदी तसच झाला आज पहाटे ... नवरोबांना officeला निघायच असतं ६.३० ला तर ते ५.०० चाच गजर लावून ठेवतात आणि तब्बल ४५ मिनिट snooze करत करत घोरत पडलेले असतात.... ह्यात माझी आणि माझ्या तान्ह्या बाळाची बरयाचदा झोपमोड होते... पण त्यांना त्याचा काहीही नसतं... गजर आपला वाजताच असतो ठणाठणा...ती झोपमोड होत असतानाच मग नवरोबांच्या कपड्यांची शोधाशोध सुरु होते... त्यात कपाटाचा उघडण्या-बंद करण्याचा आवाज... hangers मध्ये matching pant शोधण्याचा आवाज.... मोजे शोधायला drawer उघडलेला असतो... पाकीट दुसऱ्या drawer मध्ये शोधण चाललेल असत... त्यात office मधून एखादा फोने येतो... फोने वर बोलता बोलता कपडे change करण चालू असत. त्यात हातातून बेल्ट निसटून धम्मं असा आवाज येतो आणि माझं बाळ उठून रडायला लागत .... मग त्याला दुध पाजत पाजत मला परत डुलकी येऊ लागते... तो शांत झोपतो आणि मी पण परत निजायचा प्रयत्न करते तोवर नवरोबा मला उठवतात.... आग, कॉफी कुठे ठेवली आहे? किवा तुझ्याकडे जरा फूड coupons आहेत का? किवा अगं ती आपली pan कार्ड ची xerox कुठे ठेवली आहे?.... झाल माझं टाळक सटकत... मी उत्तर देते आणि सोबत मनात शिव्या पण... हे करून खर तर माझं भल होणार नसतच....आणि झालेली झोपमोडही परत झोपेत बदली होणार नसते....पण आहे हे असा आहे... तर मग मी बापडी...बिच्चारी सक्काळी सक्काळी उठते आणि ६.३० ला शेवटी रडत खडत का होईना... morningwalk ला जाते... हा असा regular accident झाला नसता तर मला माझा exercise routine इतक सुरळीत चालू ठेवता आल नसत... thanks नवरोबा... अशा accidently regular झोपमोडी बद्दल ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment