
कालचा दिवस प्रचंड धकाधकीचा आणि दमछाकिचा गेला. घरी बाकी सगळ्यांना आजारी पडल्यावर आराम करायची मुभा असते पण तशी मुभा घरातल्या आईला नसते. आणि ती आई म्हणजे मी आहे. माझा अंग दुखून ताप आल्यासारखं झालं होतं. त्यातंच चार पैकी २ बायकांनी दांडी मारायचा निश्चय केला. आणि त्यांच्यात फोने करून सूचना देण्याचा प्रश्नच नसतो. मग स्वयंपाक-पाणी, केर-वारे, भांडी घासणे, कपडे, घर आवरणे, dusting, झाडांना पाणी इत्यादी इत्यादी करत करत दुपार झाली. कान्हाला काल दुपारचे झोपायचेच नव्हते. तो टक्क जागा होऊन रडत होता. त्यातंच त्याला जुलाब आणि उलट्या सुरु झाल्या... ते करत करत संध्याकाळ कशी झाली कळला नाही. मग कान्हुल्याला pram मध्ये घेऊन बाहेर गेले round मारायला. घरी लवकर आले तोवर नवरोबा परत आले होते. सगळे संध्याकाळी ८ वाजता जेवलो. मग कान्हानी डुलकी काढायचा निश्चय केल्यावर आम्ही भराभरा serials पाहून घेतल्या. tata sky plus मुळे ३० मिनिटांची serial १० मिनिटात पाहून होते आणि अर्ध्या तासात ३ serials पाहून होतात. माझे हल्लीचे blogs अनुदिनी type होताहेत. का होईना. नित्य नियमाने काहीतरी वाचावे नी लिहावे... वेळेवर जेवावे... लवकर उठावे नी लवकर निजावे, असं ब्रीद मी सध्या आचरणात आणण्याचा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment