हुश्श... आजचा दिवस चांगला गेला... म्हणजे नक्की काय बरं झालं? म्हणजे बघा ह एक तर आज होता रविवार सगळ्यांचा हक्काचा वार... खरं तर दुसर्यांची सुट्टी म्हणजे घरातल्या गृहिणीची सजा नी परीक्षाच असते. म्हणजे होतं असं की सगळे घरी असल्याने तिला सगळ्यांचेच ताळतंत्र सांभाळावे लागतात... ह्यांच्या चवीचं करा... त्यांना हे वाचू द्या... इकडे ह्यांची ही हौस पुरवा... तिकडे त्यांचे कपडे नीट ठेवा... मग इकडच्यांना shopping आणि तिकडच्यांच्या पाहुण्यांची सरबराई करा... मग इकडे शांतपणा द्या... तिकडे मनसोक्त वाचायला किवा picture पाहायला द्या किवा मनसोक्त channel surfing करायला द्या... नाहीतर आरामात paper वाचायला द्या... गप्पा ठोकायला द्या... त्यांच्या अनेकावीध खाण्या पिण्याच्या फरमायीशी पुरवा... असंख्य कप चहा करा... पाहुण्यांचे अदबीने आणि हसतमुख स्वागत नी ऊठबस करा... मुलांचे अभ्यास, शी, शु, जेवणखाण, मोठ्यांचं पथ्य सांभाळा...परत येणाऱ्या आठवड्याचा planning करा ह्यात त्या बिचाऱ्या गृहिणीची ससेहोलपट नि तारांबळ उडत असते... असाच एक रविवार जर आपल्या आयुष्यात ह्या विरुद्ध आला तर? म्हणजे कल्पना पण करवणार नाही... छान बेड टी विथ गरमागरम breakfast करत निवांत पापर वाचायला मिळणे.... नंतर सोफ्यावर आडवं पडून मनसोक्त channel surfing करणे... मग जरा उशिरानेच अंघोळकरून छान तय्यार होऊन बाहेरच जेवायला जाणे... मग जेवण झाल्यावर उत्तम वामकुक्षी घेणे व चांगली चार तास पलंगावर घोरत झोपणे....संध्याकाळी आधी भरपूर शोप्पिंग करणे... मग एखाद्या मौल शोप्पिंग केला तर posh restaurant मध्ये dinner किवा street shopping केलं तर पावभाजी नाहीतर चाटवर ताव मारणे आणि ९ ते १२ चा movie show पहिला कि रात्री १२ नंतर मस्त long drive करत आवडत्या व्यक्तीचा हात हातात पकडत घरी येऊन शांत पाने झोपणे... हाहाहा आली न मजा हे वाचून मैत्रिणींना? हे सगळा कल्पनेतलं चित्र आहे ही कल्पनाच करवत नाही न? anyways तुम्हाला हे सगळं सांगायचा घाट एवढ्याच साठी घातला कि हा ideal दिवस कधी न कधी तरी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नक्कीच येईलही...नाही असा नाही...पण तो येई पर्यंत आपण काय करू शकतो ते मी आज थोडसं सांगणार करणार आहे...
आज नेहमीप्रमाणे मी भल्या सकाळी म्हणजे पहाटे गजर बीजर लावून morningwalk ला जायचं ठरवलं... पण रात्री सर्दीने हैराण झलेल्या माझ्या ८ महिन्यांच्या कान्हानी मला रात्रभर जगाविल्याने तो plan snooze mode वरच बारगळला... मग शेवटी जाग आणावीच लागली ती कान्होबांच्या सकाळी ७ च्या रडण्याच्या गजराने... कान्हुल्याने शी केली होती आणि जोर जोरात रडणं चालू झालं... मी झोपेतच माझ्या नवऱ्याला हिमांशू ला हाक मारून सांगितल, " hims , please त्याला hall मध्ये घेऊन जा न, काल रात्र भर मी जागी होते रे त्याच्या सर्दीमुळे मला जाम झोप आली आहे. त्याची शी पण पुसशील का?" हिमांशू चा surprisingly "हो" असं उत्तर आल... आर्जाववजा विनंतीच्या सूर वापरून मला आणखीन १.५ तास झोप मिळणार होती, तर मी का नाही वापरणार ही मृदू भाषा!!! मस्त ८.४५ ला जाग आली ती दारावरच्या बेल ने... कानाने चाहूल घेतली तर लक्षात आल कि नवरोबन्नी paper घेतला होता, दुध आणल होत नी कचरेवाल्याला कचरा देखील दिला होता... एवढच नाही तर आज स्वतःची कॉफ्फी पण स्वतः करून घेतली होती... वाह्... क्यां बात हैं!!!! मग का कुणास ठाऊक मला उगाचच थोडी लाज वाटली स्वतःची.... म्हणजे मी काहीच गुन्हा केला नव्हता तरी घरच्या करत्या स्त्रीची अशी आराम करायची वृत्ती किवा संस्कृती आपल्या भारतात अजून तरी नाही... मग उठले प्रातर्विधी आटोपून आधी कान्होबांची मंमं बनवली... तो पर्यंत एकेक कामवाल्या बाया यायला लागल्या.... आजचा दिवस असाच सोन्यासारखा होता म्हणायचा कि आज एकही बाईनी धांदरटपणा केला नाही कि मला त्यांच्यावर आवाज चढवावा लागला नाही... सगळी काम करून पटापट निघूनही गेल्या सगळ्या... एकीकडे कान्होबांच्या शी शु ची जवाबदारी नवरोबांनी उचलली होती तिकडे मी युद्ध पातळीवर नाश्तापाणी-स्वयंपाकात जुम्फले होते... हिमांशूची गरम breakfast गार करून खायची आणि तो खाता खाता एक एक तास त.व. पहायची वाईट खोड आहे... ती न करता त्याने मी केलेली साबुदाण्याची खिचडी T.V. न बघता ५ मिनिटात संपवली... एरवी जेवण खाण्याबद्दल निरुत्साही असलेल्या त्याने परत एकदा ती वाढूनही घेतली आणि मला म्हणालाही कि " आज मस्त झालीये खिचडी" अरे देवा... हे स्वप्न बिप्न होत कि काय??? त्याच्या ह्या वागण्यावर खुश होऊन मी जेवणासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ करायच ठरवल.... दुपारच्या जेवणात pasta पाहून स्वारी भलतीच खुश झाली... आज आमच्या चिरंजीवांनीही सगळी मंमं चटकमटक करून संपवली आणि चक्क ३ वाजता झोपी गेले... मग मी सुद्धा जरा लोळत पडले. अर्धा तास झोप काढल्यावर जाग आली...सगळे पापर अतः पासून इथी पर्यंत वाचून काढले... त्यात शनिवार रविवार च्या पुरवण्या almost सगळ्या वाचून संपवल्या.... जे करायला मला आठवडा लागायचा अशी गोष्ट मला दोन तासात करता आली.... कान्होबा उठल्यावर रात्रीच्या जेवणाची, त्याच्या खाण्याची सोय करण्यासाठी उठले तर नवरोबांनी मला चं बातमी दिली...."अग तुझे आई-बाबा मावशी-काका भाऊ आणि आजी आत्ता आपल्याला भेटायला येताहेत त्यांचा मगाशीच फोने येऊन गेला. तुझा cell silent वर होता न, म्हणून त्यांनी मला माझ्या cell वर कळवल... तू वाचनात इतकी मग्न होतीस कि मी तुला disturb नाही केल..." हे ऐकून मी तर तीन ताड उडालेच... होत असं कधी कधी, हे आपण काहीतरी वाईट घडल तर बोलतो.... आज मला काहीतरी उत्तम घडतंय तर हे म्हणावसं वाटल... ठरल्याप्रमाणे सगळे आले.... मग मी आईच्या मदतीने मिळून छान कांदा भजी आणि आल्याच्या चहा चा बेत केला. सगळे ह्या पाहुणचाराने अगदी खुश.... एरवी काहीसा अलिप्त असलेला हिमांशू आज सगळ्यांशी बोलत, गप्पा मारत होता हे पाहून फारच बरं वाटल... कान्होबा अर्थातच सगळ्याचं centre of attraction होते. त्याच्या बाललीलांनी तो सगळ्याचं लक्ष वेधत होताच.... साधारण ८ ला सगळे गेले. तर नवरोबा म्हणतात... आज इतके heavy snacks झालेत तर आज जेवणाला काट मारू आणि छान दही भात खाउन झोपू.... मी तर घेरी येऊन पडायचीच बाकी होते....मग cooker लावला आणि इंटरनेट on करून gmail facebook बघत बसले... कान्होबा छान खेळत होते ... हिमांशू चक्क T. V . न पाहता आणि laptop मला hava ह्या विषयावर न भांडता चक्क पुस्तक वाचत पडला होता.... रात्रीची जेवण झाली आणि मी हातात remote घेतला, त्यावर हिमांशू नि कान्हाला घेतला आणि बेडरूम मध्ये गेला.... program च्या break मध्ये मी हळूच आत गेले तर नवरोबांनी कान्होबाला छान diaper आणि nightdress चढवला होता आणि अनुष्का शंकरची सितार I-pod च्या speakers वर लावून त्याला झोपवत होता... ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लगल... एवढ्यात हिमांशूला माझी चाहूल लागली.... झोपलेल्या कान्हाला अलगद त्याच्या बेड वर ठेऊन हिमांशू ने गोड smile देत माझे डोळे पुसले आणि म्हटल, " Prajakta , thanks for all that you do !" ... त्यावर मी काय म्हणणार.... मी पण म्हटल, " thanks ...for all that you have done..."
Nice one. Thanks Prajakta for writing this. Trying to impress me hoping that every Sunday will be like this! Hahaha.... ;)
ReplyDelete