काही रुक्ष सुके क्षण तो
ओले करून जातो
आणि येणारा उष्ण कोरडा काळ सुसह्य तरी होतो ...
त्या क्षणांचा ओलावा गार होऊ लागतो ,
थरथर कापून हुडहुडी भरवून बेजार करू लागतो ...
मग युक्ती लक्षात येते ते ओलं मन पुसण्याची
नको त्या थंड क्षणांवर हक्काने रुसण्याची ...
तेवढ्यात परत चाहूल लागते रणरणत्या उन्हाची
आणि वाट पाहत बसते न घडलेल्या गुन्ह्याची
उब मिळेल ह्या आशेवर बरेच दिवस जातात
असेच थांबून थांबून मग माणस मरून जातात ...
- प्राजक्ता साठे
- प्राजक्ता साठे
wah.. insightful...
ReplyDelete