गोठलेल्या सागराचा कोंडलेला श्वास तू
स्वप्नांनी मंतरलेली काळीकभिन्न रात तू
जीवघेण्या एकांतातला अस्वस्थ निरंतर फास तू
ओंजळीत साठावलेला बॆकरारि त्रास तू
ठेच लागून चालतांना मीच का रे थांबले?
बेदरकारी स्वैर वागून दुखः तुझे का पांगले?
दान आयुष्याचे मागून कर्म करार संपला
चुकलेल्या वाटेवरती फासा परत पलटला
उमलले स्वयं चे स्वर्णचक्षु संथ श्वास सावरला
नासलेला डाव माझा पुन्हा नव्याने आवरला
आसवे आटवून कोळून कारुण्य ते
सलणार्या आठवणींचे विसर्जन डोहामधे
जुळवते नभ डोळ्यात साठवून परत उरातली बंधने
अधरावरील तुझ्या ओठातुन धुंद स्वरातील स्पंदने
परत डाव मांडताना फिरून शब्द दाटले
तुझे व्यक्तित्व पांघरून प्रेम सदोहर थाटले
आता न भीती न चिंता न किंतु
भार मनाचा संपला
आधार हि न मागता
क्षितिजावर बिंदू गवसला
ज्यात होतेच मी होतास तू नि प्रारब्ध ते
नजरेतल्या आश्वासनाने तुझ्या सच्चिदानंदी विलीनले
- प्राजक्ता साठे
No comments:
Post a Comment