Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Tuesday, February 16, 2016

चाफा

नभ पावसाळी
त्यात तुझं येणं, अवेळी… 
आपली भेट रानोमाळी
ओल्या सायंकाळी
वाऱ्याची झुळूक ना साधी ना भोळी 
अकस्मात येणाऱ्या मंद जुळूक 
म्हणजे तुझं येणं… तसं उशिराच… 
अभिसारिका मी नी तुझी छबी लडिवाळी 
शहारलेला तू, लाजलेली मी… 
काय करावं न कळून
देऊन टाकीन मी तुझ्या हातात
न उमललेली एक चाफेकळी
बकुळीच्या सवयीचा तू,
मग गोंधळून विचारशील मला
आज सुगंध बदललाय?
त्यावर मी म्हणेन… 
आज मीच चाफा झालीये
ते ऐकल्यावर माझा हात तुझ्या दोन्ही हातात घेशील
सायंप्रकाश उजळेल माझ्या भाळी… 
एक अस्फुटशी रेघ हास्याची माझ्या गालावर
आणि तुझ्या उरात चाफ्याचा श्वास
 माझ्या हातांच्या काही कळ्या...
आपण दोघेही झालो असू एकंच... 
सुगंध...
- प्राजक्ता साठे 

1 comment: