रात्रंदिवस तुझा विचार करून
विणलेला स्वप्नांचा गोफ
तुझ्या अस्तित्वावर अलगद सोडत
तुला जाणीव करून देतेय
माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाची
बदल्यात हवाय एक मौका
काही संभाव्य पर्यायांचा
ज्यात मी असेन अन तू हि
तुझं हृदय पकडणारं
आनंदाचा जाळं आहे माझ्याकडे
ते टाकण्याआधी
कोरतेय भविष्य आपलं
वस्तुस्थितीच्या दगडात
अनुभवांच्या छीन्नीतून
जिथे प्रेम आहे तिथे प्रश्न नसतात
एवढंच जरी कळलं न तुला
तर संपेल हि अविश्रांत विराणी
आणि सुरु होईल आणखीन एक
प्रेम कहाणी...
- प्राजक्ता साठे
- प्राजक्ता साठे
No comments:
Post a Comment