Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Tuesday, February 2, 2016

सोबत



तुझ्या आठवांच्या मोहोरांनी बहरलेलं माझ्याकडे एक झाड आहे 
यंदाच्या पावसाळ्यात त्यातला बराचसा गुलमोहोर ऊष्ण धरेवर रंग शिंपडेल 
तरीही पुरून उरेल इतका फुललाय हा वृक्ष नि त्या खालचा लाल गालीचा 
आनंदअश्रूनी डबडबलेल्या डोळ्यांसारख आभाळ भरून आलय 
काळजाचा एक ठोका चुकतो काय नी पाण्याची बरसात होते काय 
असं हे ढगाळ सगळ कधीही बरसायला लागेल 
पहिल्या पावसात भिजून आपल्या गालिच्यावर हिरवी मखमल धरेल 
त्यावरून चालण्याचा उगाच तुझा हट्ट 
आणि मग घाबरत सावरत आपली पकड घट्ट  
भर उन्हात मृद्गंधाच्या झुळूकीप्रमाणे 
कुठल्याही क्षणी शांत स्तब्द वाटणारे तुझे डोळे 
जादूच काहीतरी फुलून आलय कुठूनतरी 
तुझ्या माझ्यात 
भूतकाळाच्या हिंदोळ्यावर शब्दांच्या गुंफणित 
झुलून आलाय काहीतरी 
आपल्या साम्राज्यात 
तुझ्या स्पर्शाची ऊब अजूनही भासतेय ह्या तळव्यावर 
तळवे जोडले कि ओंजळ  भरून वाहतेय त्या नदीच्या पाण्यानी 
ज्या काठावर आपण आपली सावली सोडून आलो 
चिंब भिजले तरी पावलांना थंडगार पाऊस बिलगत नाही आता 
एक थर हळदीचा घट्ट मिठी मारून बसलाय त्यांवर हट्टीपणाने 
आणि श्वासात अद्वितीय असा गाभाराच वसलाय आता 
डोळे मिटले कि त्यात ताल मिसळतो इंद्रयाणीचा 
नी अधे मधे तुझ्या माधुबोलांची गुंफण… काहीबाही गुणगुणारी स्वरनक्षी 
आपल्या कानातली वाजत असलेली गाणी… प्रवास ताल … निसर्ग वेड … 
बोलकी, अबोल, मुकी, स्पुट, हास्य, नेत्र, सानिध्य, सोबत… 
माझ्या भासत असलेल्या सगळ्याच आठवणी आता तुझ्या झाल्यात सख्या 
आवरूया , सावरूया , सारवूया कि?…  

प्राजक्ता साठे 


1 comment:

  1. Manat khup kahi dadun basalay te vyat kartayat tuze shabd. Lambachya pravasala nighalo asatana unhachi zal achanak pavasachya thembani thand karavi mathicha suvas yeun shant karavi manala ashi ahe.

    ReplyDelete