मोगरा माळून दे
गंधाळल्या केसात माझ्या
तू स्वतः भाळून घे
हृदतृषेच्या काव्यपंक्ती
आसवे गाळून दे
प्रेमअग्नी स्वार होऊन
भानचित्त जाळून घे
गजऱ्यातल्या काही कळ्या
घे तू अलगद वेचुनी
मधु तयातील तृप्त करतील
ध्यास मनीच्या उन्मनी
घे जरा समजून तू कि
कोणता संकेत तो
पाश अंतरीच्या जीवाचा
भ्रम फितूरच वाटतो
भाव तो एकांत समयी
चित्त भारून आगळा
जो तुझ्या शब्दांत स्फुरतो
तोच मम नच वेगळा
तोडूनी ते पाश नि आभास तुडवून वागले
घोर रात्रीही तुझ्या आत्म्यास बिलगून जागले
पहाटेच्या रम्य समयी तृणदवांनी नाहले
पारिजताक वेचुनी स्वसमाधीस वाहले
- प्राजक्ता साठे
No comments:
Post a Comment