मी ही एक वाट चुकलेली राधा होते कृष्णा...
बांध फुटल्यावर वाहते तशा लाटेसारखी लोटले होते तुझ्याकडे...
तू बेरकीपणाने स्वीकारही केलास माझा... अगदी निस्संकोच
मी वेडी, भाळले त्या साऱ्याला तुझा उत्स्फूर्तपणा समजून...
त्या वेळेस माझ्या भावना उत्कट होत्या आणि बरंचस प्रेमही...
हो बरंचस...
प्रेमासाठी आसुसलेली मी, तुझ्यावर विश्वास टाकून आले तुझ्याबरोबर...
तू म्हणशील तिथे, तू नेशील तिथे, तू जाशील तिथे...
तू मात्र फक्त खेळवत होतास मला... एखाद्या निर्दयी अवलीयासारखा...
कि नाही??? तू तर खूप मोकळा होतास...
माझंच चुकत होत
कळून वळत नव्हत...
प्रेम करण्याचा नि मिळवण्याचा कैफ चढला होता माझ्यावर...
तू म्हणालासही...
अग खुळे... राधे... हे प्रेम नाही, हे एक वळण आहे...
तू जा परत राधा तुझं सगळ नीट होईल...
पण अस म्हणत तू कवेत घेतलस मला तुझ्या...
असा दुष्ट दुष्ट होतास तू...
ती वेळाही तशीच होती, दिवसाची नी आयुष्याचीही...
चांदमोळी..
कुठल्याश्या गाफील क्षणी मग ताबाच घेतलास तू माझा तुझ्या कृष्ण्सामार्थ्याने...
आणि गुरफटत होते मी, त्या अलवार मोहजाळात...
पण तू मात्र तेव्हाही म्हणत होतास,
राधे तू परत जा...
आणि मुग लक्ख्कन वीज चमकली कुठेतरी...
तू माझा नव्हतास...
कधी होणारही नव्हतास माझा तू...
किती नी कुठे फिरलो रे आपण...
एकमेकांसोबत...
दर्या खोऱ्यात... रानांवनात...डोंगर नद्यात...
पुन्हा गोकुळ सापडलच नाही रे आपल्याला...
शोधता शोधता...
जाणीव होत होती मला माझ्याच देण्याची...
देत होते मीच सगळ...भरभरून...
पण ते निरपेक्ष नव्हत हे हि तितकच खर...
अपेक्षा होत्या लगडलेल्या त्या देण्याला...
तू घेता घेता म्हणत होतासच कि ...राधे तू परत जा...
मला तुझं प्रेम हव होत...
तुला मी हवी होते...
प्रश्न सोप्पा होता तुझा...
राधे तुला मी हवाय कि प्रेम?
ते दोन्हीही एकच असतात ना रे कृष्णा?
नाही...तुझ्या माझ्या बाबतीत ते ह्या जन्मात तरी शक्य होणार नाही...
कारण मला तू हवी आहेस नी तुला प्रेम...
माझ्याकडे प्रेम नाही नी तुझ्याकडे तूच उरली नाहीस...
ह्या सगळ्याची सांगड घालता येत नव्हती मला...
तू प्रेमापेक्षा वेगळा आहेस हे शिकत होते मी...
तुलाच प्रेम समजण्याची चूक करत होते रे...
मग मी माझ्यातल्या राधेलाच परत पाठवल...
प्रेम मिळाल नसल तरी माझं मात्र बर चाललय...
शोध अजूनही सुरूच आहे...
आता मात्र एकटीने...
पण कुणीतरी मात्र खुश आहे....
कारण त्याची राधा परत आली आहे...
- प्राजक्ता साठे
- प्राजक्ता साठे
very alive! very true! very upfront! loved it! :)
ReplyDeletethanks :)
ReplyDeleteKiti divasaani vachatey tuzhi kavita..only I thing I miss is those beautiful aani "thallak Akshara".. "blogs navhate tya dvsanchi aathavan.. ;) khupach sundar.. just loved it..
ReplyDeleteLove u Prajakta...
ReplyDeleteFarach sunder, bhavana khupach othambun vahat ahet. . . farach hridaysparshi likhan. . . farch avdale
ReplyDeleteFarach sunder, bhavana khupach othambun vahat ahet. . . farach hridaysparshi likhan. . . farch avdale
ReplyDelete