तेव्हा त्या पाण्याला मातीच्या कोरडेपणाचा थांगपत्ता ही नसतो…
ढग दाटून आल्यावर मातीची ऒढ तृषेचा कहर गाठते
जळ पिऊन तिच्या उरावर बहार दाटते…
गर्भरेशमी वल्कलं ल्यायलेली ती…
जणू सुकुमार कोमल नववधूच जणू
थेंबांची लय जणू तिच्या हातातले रुणझुणते कंकण बिलवर …
मधूनच गडगडणार आभाळ…
जणू हळूच पावलं न वाजवता चालण्याचा तिने केलेला केविलवाणा प्रयत्न…
लखलखणारी वीज तिच्या नाकातल्या नथीतला खडा…
दबक्या चालीने चालणारी ती जणू वळवाचा संथ वारा…
आणि तिच्या गजऱ्यातील मोगरा मृद्गंध…
सागर तिचा नाथ
त्याच्याशी मिलन महाकठीण
पण ती जाते वाट मिळेल तशी वळेल तशी
सागरही मग अधीर आतुर तिच्यासाठी लाटा रुंदावतो
झेपावतो काठाकडे
ज्या क्षणी नजरनजर होते एकमेकांची
त्या क्षणी ती…
लाजत मुरडत न बसता लोटून देते स्वतःला
आणि एक होते पूर्ण गोष्ट आव्हानाची
निसर्गाची,
तुझी - माझी
- प्राजक्ता साठे
Sagar Kadhicha Lata Unchavat Tila Ishare Kartoy. Khup Adhir Zalay Bhetanya Sathi. Ani Tya Latanmadhe Swatahach Radu Lapavanyacha Prayatn Kartoy. Tarihi Tyala vishwas Ahe Ki Lal Makhamali Prajaktacha Ani Trushancha Angavar Varshav Gheun Tyala Bhetayala Yeil.
ReplyDelete