Pages

Powered By Blogger

Total Pageviews

62,587

Sunday, February 7, 2016

काळीगोरी पिसं...




दिन रातच पाहुणा
अंगी वागे बहुगुणा
जसा आकाश पाळणा
करे मातेला तो खुणा

कशी तू गं काळीकुळी
उडे वाऱ्यावर खुळी
धूळ पाणी आणे डोळी
भिजे मळलेली झोळी

थकलेला तोही दिन
शिरे कुशीत रातीच्या
तिला घेऊन कवेत
ऐके गोष्टी तो भीतीच्या

मग उठवे ती दिनाला
दानदान हलवून
रात्र हळूच सरली
झोप्या दाराच्या खालून

मग वाटे आपणाला
किती थिटीथिटी रात
सरता ती सर नसे
येड्या दिसाची ती जात

- प्राजक्ता साठे

3 comments: