Pages

Follow by Email

Total Pageviews

Thursday, April 3, 2014

R.I.P.

पुरिया धनश्री ऐकल्यावर संपूर्ण भरलेल वाटतं तसा मारवा ऐकवलास तू आज आधा अधुरा मधेच सोडून दिल्या सारखा बेवारस पोरका… जा तू तुझ्या वाटेने मी कोण सांगणार… थांबवू तर शकलेच नाही पण निदान निरोप तरी घ्यायचास . श्या ,साली किस्मतच निकम्मी तुझी त्याला कोण काय करणार . तिथे ऐश कर बाबा… अप्सरानबरोबर Flirt कर. गंधर्वांना पकाऊ jokes सांग . किन्नरींना भसाड्या आवाजातली तुझी गाणी ऐकव.
आणि हो चित्रगुप्ताला अवांतर वाचनावर गुगली प्रश्न टाकून भाम्भावून सोड. तिथे बरेच मुंबईकर असतील cricket वेडे त्यांच्याशी तंगडतोड match खेळ.  नसतील तिथे पण तरी फुकटात मिळतंय तर तपासून घेणारे खूप भेटतील पुणेकर .

  मग तिथल्या तिथे cyber cafe शोध आणि FB वर येऊन chat तरी कर Dr. please please तुझ फस्सकन हसणं आणि मोठ्ठा आवाज ऐकायचं . तो ऐकव नि मग जा  परत. मी नाही थांबवणार तुला . तुझी विशीतली सुंदर बायको नाही तान्ही लेक रीतन्या नाही आई बाबा नाहीत मित्र परिवार नाही कुणीही नाही . फक्त एकदा ये न. bye तरी म्हणू दे रे … जा कट्टी पण घेऊ शकत नाही आता तुझ्याशी . नकचढ्या येऊ वर तेव्हा नक्की जाब विचारू .
तुझेच
कीर्तीमय काही … 

Thursday, March 27, 2014

THE ANSWER


your tears, my grief
a melancholic fusion
death... a common factor
of stark communion
in our lives
your childhood was killed
my youth was murdered
our destinies await
some impatient results
and huge unexperienced incompleteness
an urge to find out
what we know knot...
intertwined in our blueprints 
you need mothering
I need love...
we aren't mutually exclusive 
inclusive are our questions...
let the souls talk
let the flow decide
let the world unfold 
by the drop of our words
let us create 
what we yearn for...
the most...
a reply!Monday, March 24, 2014

सागरप्रिया


पाऊस अचानक रिमझिम बरसतो…
तेव्हा त्या पाण्याला मातीच्या कोरडेपणाचा थांगपत्ता ही नसतो… 
ढग दाटून आल्यावर मातीची ऒढ तृषेचा कहर गाठते
जळ पिऊन तिच्या उरावर बहार दाटते… 
गर्भरेशमी वल्कलं ल्यायलेली ती… 
जणू सुकुमार कोमल नववधूच जणू 
थेंबांची लय जणू तिच्या हातातले रुणझुणते कंकण बिलवर … 
मधूनच गडगडणार आभाळ… 
जणू हळूच पावलं न वाजवता चालण्याचा तिने केलेला केविलवाणा प्रयत्न… 
लखलखणारी वीज तिच्या नाकातल्या नथीतला खडा… 
दबक्या चालीने चालणारी ती जणू वळवाचा संथ वारा… 
आणि तिच्या गजऱ्यातील मोगरा मृद्गंध… 
सागर तिचा नाथ 
त्याच्याशी मिलन महाकठीण 
पण ती जाते वाट  मिळेल तशी वळेल तशी
सागरही मग अधीर आतुर तिच्यासाठी लाटा रुंदावतो 
झेपावतो काठाकडे 
ज्या क्षणी नजरनजर होते एकमेकांची 
त्या क्षणी ती… 
लाजत मुरडत न बसता लोटून देते स्वतःला 
आणि एक होते पूर्ण गोष्ट आव्हानाची
निसर्गाची, 
तुझी - माझी 


Sunday, March 23, 2014

Conversation...

Conversations start like an off season shower of rain
They slowly rise feriously like a stormy whirlwind
And continue like a rhythm of a train passing through a tunnel
In between are random halts of stations Also intermittent pauses like a space bar on the key board
Then there is a break not much like a movie star but a real one...
Then there is a wait a longer one like a full blown pregnant dame about to pop
Then some agreement some fight some make ups n many goof ups
Big time lingering n dwindling follows
Like a menopausal lady n some more
Before one know it death is near
That's when we realise that We ve had a relationship so dear
Conversation ends mouth zips up...we die...

Saturday, March 22, 2014

अद्विता


मोहरलेल्या त्या क्षणी
मोगरा माळून दे
गंधाळल्या केसात माझ्या
तू स्वतः भाळून घे
हृदतृषेच्या काव्यपंक्ती
आसवे गाळून दे
प्रेमअग्नी स्वार होऊन
भानचित्त जाळून घे
गजऱ्यातल्या काही कळ्या
घे तू अलगद वेचुनी
मधु तयातील तृप्त करतील
ध्यास मनीच्या उन्मनी
घे जरा समजून तू कि
कोणता संकेत तो
पाश अंतरीच्या जीवाचा
भ्रम फितूरच वाटतो
भाव तो एकांत समयी
चित्त भारून आगळा
जो तुझ्या शब्दांत स्फुरतो
तोच मम नच वेगळा
तोडूनी ते पाश नि आभास तुडवून वागले
घोर रात्रीही तुझ्या आत्म्यास बिलगून जागले
पहाटेच्या रम्य समयी तृणदवांनी नाहले
पारिजताक वेचुनी स्वसमाधीस वाहले

Friday, March 21, 2014

व्यक्त ...


मला ,
कुणीतरी आज अवखळ नदी म्हटल ,
संतत प्रवाही वाहणारी ,
रोज नव्याने फुलणारी ,
नवी स्वप्न वीणणारी … 
म्हटल त्याच अवलीयाने ,
गं तू तर शुद्ध शक्ती 
नी अस्सल कलाभोक्ती 
आठवण करून दिली त्यानेच 
दररोज आरशात पाहून 
खळखळून हसण्याची 
स्वप्न बघता बघता 
ती खरच आपण जगत आहोत
 हे तितकाच खराखुरं भासण्याची 
गम्मत आहे सांगता सांगता
 शिकवून गेला काहीबाही 
अनुभूती येईल काही दिवसात 
देत होता खट्याळ ग्वाही 
आकाश होते गडद जांभळे 
होते हजार लखलख ठिपके 
त्यात होता ऋतू बावरा
वाऱ्याचेही हजार नखरे 
नको करू मंथनाशी सलगी  
असेच तोही सुचवत होता 
ध्यानधारणा जीव गुंतणे
सूटवण्यास तो संथपणे 
मज पटवत होता 
पांघरून नीज तो अलगद झाला वेगळा
घेऊन उशाशी शब्द त्याचे श्वास माझा आगळा 
उतरले नक्षत्र आज त्याच्या जणू मुखातुनी 
लेखणी माझी थिटी, स्फुरते उरा-स्वरातुनी 
मुक्त मी नी युक्त तो तरी ध्यास का वाटे जरा 
स्वमनस्वी मम म्हणावे, परतुनी नच आता फिरा 
फेर बंधा बांधला आता उड्डाण जाहले 
चिरनीद्रेतूनही सत्यात त्याला पाहले Thursday, March 20, 2014

रास सखी ...


सोसवेना चंद्र मजला सोसावेना  चांदणी
त्या  नभीच्या लक्ष तारा उतरल्या ह्या अंगणी
जुई बहरली रात्र सरली स्वप्न उरली लोचनी
त्या उराच्या गोड तारा छेडील्या मनभावनी
हात हाती देत असता धार नजरी टोचते
लाल गाली रंग भरता लास्य हृदयी पोचते
घेऊनी कवेत साऱ्या अर्थ मनीचा गावला
मोरपंखी स्पर्श सखया नेत्र गात्री भावला
ओळखुनी ते इशारे द्वारअलगद लोटले
अंतरंगी सूर बरसुनी स्फटिक किरणी गोठले